हो विजयी!

Started by shubham shahaji supane, February 15, 2017, 09:57:47 PM

Previous topic - Next topic

shubham shahaji supane

होईल नवी पहाट पुन्हा,
सोबत दृढ आशाकिरण घेऊन
कर तु काबिज रे गड्य।,
पुन्हा ते निळेशार आकाश.

आसमंत सारा हात फैलावुनी,
उभा तुझ्या स्वागतास
शर्थीने खिंड लढवुनी आता,
बनव तुझे जीवन रंगीत.

वाटेत येवून असंख्य अडचणी,
करतील तुझा हिरमुड
देवून अर्थ जगण्यास पुन्हा,
उभा रहा खंभीर.

होईल साध्य हवे जे तुला,
लागेल थोडेसे परिश्रम
करून रक्ताचे पानी तु,
बन  रे  नवा आर्दश

उजळून निघेल आसमंत सारा,
तुझ्या पराक्रमी यशाने
होईल जयजयकार तुझा,
अभिमानी हर्षाने.


SHUBHAM SHAHAJI SUPANE
(7350878463)