आता तुच दिसतेस मला सगळीकडे

Started by Rahul Ghorpade, February 17, 2017, 01:03:35 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

हा प्रत्येक क्षणी
आणी प्रत्येक वेळेस
आता तुच दिसतेस मला सगळीकडे.....
हा जातो मी
अजूनही तिथेच
जिथे भेटत होतो आपण कधी
आता तुच दिसतेस मला सगळीकडे....
बोलायचं खूप असतं गं
मला तुझ्याशी
पण फक्त मीच
दिसतो मला तिथे सगळीकडे...
का होतो मला
हा भास तुझा
तु आहे सगळीकडे
हा जातो मी
त्या वाटेवर
ज्या वाटेवर दिसतेस तु मला सगळीकडे...
होतो मी कावरा बावरा
पाहूण तुला सगळीकडे
का प्रत्येक क्षणी
आणी प्रत्येक वेळेस
आता तुच दिसतेस मला सगळीकडे...
Rahul Ghorpade