रंग

Started by Rahul sarode, February 17, 2017, 03:23:42 PM

Previous topic - Next topic

Rahul sarode

बहरून आला रंग क्षितिजाचा
उजळल्या चांदण्या रत्नांच्या
कंटून गेला हा स्वर
छेडून तार गाण्याचा
ओल्या रंगाने पापण्या
गेला तो थीजवून
टप टप त्या थेंबाने सारे रान रंगवून
आला क्षितिजावर चांद
गेला अंधार करून
त्याच्या तेजाने गेले सारे चित्र रंगून
हा खेळ रंगाचा जातो रंगवून रंगात
तरी रंग माझा वेगळा रंगून रंगात
रंगून रंगात