राधा

Started by Kumar Sanjay, February 17, 2017, 04:08:43 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

मी अशी नाचले होते
बासरीतुन सुर उगवता
यमुनेवर पसरली होती
घननीळ सांज नीरवता

व्याकूळ आंसमत
कांलिदीचे श्यामल पानी
अोंजळीत तु ठेवली होती
भेटायची एक कहानी

हे दु:ख कुण्या जन्माचे
राधेच्या नशिबी आले
श्वासात पुन्हा चिरडले
शब्दांचे अोले गाणे


कुमार संजय

7709826774