मी

Started by nilesh alande, February 17, 2017, 04:59:13 PM

Previous topic - Next topic

nilesh alande


मी थेंब त्या पावसाचा
खुप दुरुन मी यावे,
हसणा-या तुझ्या गालांवर
स्व:ता हासत निजावे....
मी झुळुक ती वा-याची
तुझ्या समीप खुप यावे,
न सांगताच हळुवारसे
स्पर्शुनी तुला मी जावे....
मी मोहरणारा गंध तो
तुला हवे हवेसे वाटावे,
हृदयाला चालु ठेवणारा
मी श्वास बनुन रहावे...

:-निलेश सुरेश आळंदे.