नीरवता ...

Started by Kumar Sanjay, February 18, 2017, 10:38:26 AM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

जाशिल तेव्हा थांबशिल
क्षणभर ! मावळतीच्या सूर्यावर
उमलत येईल रंग आसवांचा
सांजमिठीतील व्याकूळ डोळ्यांवर


श्वासांतुनी स्पंदने बहरली
तंद्रीत जागली स्तनाची सत्ता
या वाहत्या प्रदीर्घ चुंबनात
क्षितीजास समजली नीरवता


- कुमार संजय

7709826774