उषःकाले

Started by शिवाजी सांगळे, February 18, 2017, 07:13:05 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

उषःकाले

लेवुनी सुवर्ण किरणे उषःकाले
उभा जळी तो पाचु पित तरू,
घेण्या उब, सोनसळी रश्मींची
निवांत विसावले पंख पाखरू !

घेवुनी शिरी नभमाला विहरती
गिरीराज हळूच सुवर्णे नाहतो,
निश्चलतेने अलवार लवुन राहता
तरू स्वयेचे प्रतिबिंब न्याहळतो !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९