बा रे विट्ठला !!!

Started by श्री. प्रकाश साळवी, February 18, 2017, 08:32:26 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

बा रे विठ्ठला
------------
प्रारब्ध भोग माझे सारे पुसुन गेले
तुला भेटता विठ्ठला जिवन सार्थ झाले
तुझ्या भेटीची मज होती लागली ओढ
दिनरात तव नामाचे भजन लागे गोड
माझे मला कळेना ऐसे कैसे झाले
॥1॥
समचरण साजिरे रूप तुझे रे देवा
करून घेई मजकडून तुझीच सेवा
थोर पुण्य माझे तव नाम माझ्या मुखी आले ॥2॥
आता करू नकोस परके देवा मजला
लागू दे तव नामाचाच छंद माझिया मनाला
कृतकृत्य झालो तव भक्तित मन माझे गुंतले ॥3॥
**
✍✍प्रकाश साळवी✍✍
०८/०२/२०१७