हार-जीत !!!

Started by Vidya Chikne ( Mandhare ), February 19, 2017, 11:18:18 AM

Previous topic - Next topic

Vidya Chikne ( Mandhare )

हार-जीत !!!

मन आणि मेंदूचं
पुन्हा एकदा वाजलं
मनाला जे वाटलं
ते मेंदूला नाही पटलं

मनास वाटे उनाड व्हावे
मनमर्जी जगावे
मेंदू त्याला अडवी
धोपटमार्ग दावी

मन अवखळ
वाट फुटेल तिकडे पळे
मेंदू चाकोरीबद्ध
त्याला फक्त व्यवहार कळे

मनाला ना लगाम ना बांध
मेंदूचं सारं गणितच साधं
मन फेसाळणार्या लाटा
मेंदू नेहमीच्या पायवाटा

मनाची भरारी
उंच आकाशी
मेंदूच्या घिरट्या
घरट्यापाशी

मन म्हणे, वारा पिऊ
चांदण्यात न्हाऊ अन मदहोश होऊ
मेंदू म्हणे, चार भिंतीतच राहू
झरोक्यांमधून दुनिया पाहू

मन आणि मेंदूचं
असं नेहमीच वाजतं
मनाची हार, डोळ्यांत तरळते
अन मेंदूची जीत, रोमारोमांत भिनते

विद्या चिकणे ( मांढरे )


विद्या चिकणे ( मांढरे )
[url="https://www.facebook.com/vidya.chikne/"]https://www.facebook.com/vidya.chikne/[/url]