माझा भाऊ

Started by Asu@16, February 19, 2017, 05:48:11 PM

Previous topic - Next topic

Asu@16

माझा भाऊ

माझ्या प्रिय भावा
कसा केलास रे कावा
सोडून गेलास अचानक
अतृप्त इच्छांचा ठेवा
       शाप पुत्रवियोगाचा
       घेऊन तू गेला
       नको रागावू तू
       माफ कर त्याला
असेल दिसला तुजला
बाळ डोळ्यात अंती
मानून घे समाधान
ही कळकळीची विनंती
       कोण होतास तू
       काय झालास तू
       नशिबाच्या फे-यात
       बरबाद झालास तू
कसाही असला तरी
भाऊ होतास तू
निरोप घेतांना फक्त
अश्रू होतास तू
       काळीज ना हलते
       तुला हरवण्याने
       दुःख मात्र सलते
       तुला न समजण्याने
नको जन्मास घालू
दुर्दैवा, अर्थ ना
हात जोडून करतो
प्रभूचरणी प्रार्थना
       तारा आज तुटला
       अंधा-या आकाशात
       कुणा नाही दिसला
       पण रूतला अंतरात

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita