अवयवदान

Started by Asu@16, February 19, 2017, 05:59:07 PM

Previous topic - Next topic

Asu@16

     अवयवदान

देवा दिले शरीर सुंदर
मानवाचे भव्य मंदीर
एकेक घडविला अवयव निरंतर
कुणाही बनविणे अशक्य नंतर
भोग भोगिले, तृप्त झाले
अवयव सारे मनी तोषले
डोळे, हृदय, यकृत, वृक्क 
यंत्रे अनेक करती थक्क
दिले देवाने अवयव उधार
परत करूया दुजा साभार
अवयव चितेवर जाळू नका
नका घालवू वाया फुका
अवयवदान हे दान श्रेष्ठ
वाचवू अनेक मानव कष्ट
जगू आणि जगवू सर्वां
अमर करूया मानवधर्मा
मिळून करूया अवयवदान
पुण्य ह्यावून नसे महान
फेडू ऋण हे देवाचे
काम करूया धर्माचे

- अरूण सु.पाटील

https://www.facebook.com/AsuChyaKavita