*बंध प्रेमाचे अतूट*

Started by विजय वाठोरे सरसमकर, February 20, 2017, 11:56:23 AM

Previous topic - Next topic

विजय वाठोरे सरसमकर


बंध प्रेमाचे अतूट
तुझ्यामुळे हे जुळले
प्राजक्तांची फुले आज
तुझ्यासाठी उधळिले

जन्मा-जन्मांचे हे नाते
अलगुज सावरावे
प्रीतीत तुझ्या मी असे
बेधुंद हे बावरावे

छबी तुझीच अगदी
प्रेमात मी सजवावी
रंगीबेरंगी होऊन
राञही मी जागवावी

प्रेमाच्या या बंधामध्ये
तुझ्यात मी गुर्फटावे
हळव्या या भावनांना
अंतरात साठवावे

तुला द्यावे सुख सारे
दु:खांना मी सांभाळावे
बंध रेशमांचे असे
सदैव ते उजळावे


........साहिल..........
विजय वाठोरे सरसमकर
नांदेड
9975593359