माती माती काळी माती

Started by कदम, February 21, 2017, 12:00:17 AM

Previous topic - Next topic

कदम

*********updated*************

माझी माती,माझी गती,या मातीचे लाल आम्ही
मातीत घाम गाळुनंच,फुगते आमची छाती
माती माती काळी माती
मातीत घाम गाळुनंच,फुगते आमची छाती

वीर आम्ही,शुर आम्ही
मातीच आमचा अंगातील गुर्मी
घाम गाळुनंच रानी,फुगते आमची छाती

माती माती काळी माती
मातीत घाम गाळुनंच,फुगते आमची छाती

कष्टकरी आम्ही,नाव आमचे शेतकरी
खावुनी कांदा मुळा,वाढतं आमचं रग्गात
पीक मोत्यावणी काढूनंच,मान उंचावते खळी

माती माती काळी माती
मातीत घाम गाळुनंच,फुगते आमची छाती

जेजुरी खंडोबा मंदीरी
नवदुर्गेची लाभली कुळा शिदोरी
कृपा विठोबाची,आशीर्वाद शिवरांयांचा

सामना करूनंच काळाचा,फुगते आमची छाती

माती माती काळी माती
मातीत घाम गाळुनंच,फूगते आमची छाती

नसा नसात आमचा,माणूसकीचा खुणा
वणवा तापला रखरख वाढली
हिरवाईची अम्हा लाभली तिजोरी
शिवार पिकांनी फुलवूनंच,फुगते आमची छाती

माती माती काळी माती
मातीत घाम गाळुनच,फुगते आमची छाती