दूर जाण्या अगोदर

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, February 21, 2017, 11:03:03 AM

Previous topic - Next topic
दूर जाण्या अगोदर
माझं जीवन घेऊन जा
तू माझ्या खेळकर हृदयाशी
पुन्हा एकदा खेळून जा

कस सांगशील तू सगळ्यांना
आपलं वेगळ होण्याचं कारण
तुझ्या हक्का साठी लिहलेली
ती गोष्ट घेऊन जा

तुझ्या पत्रांन सोबत जपून
ठेवलेले ते सुकलेली फुले
तुझं माझ्या वरचं अपूर्ण
प्रेमाची निशाणी घेऊन जा

तुझं जगणं अवघड होईल
जेव्हा तुझं सौंदर्य कमी होत जाईल
मग थांब जरा तुझ्या साठी
माझ वाया गेलेलं तारुण्य घेऊन जा

तू जिथं आहेस तिथं सुखी
आहेस जाता जाता
माझ्या डोळ्यातील वाहते
अश्रू घेऊन जा

जाता जाता माझ्या
हृदयाशी पुन्हा एकदा खेळून जा



✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर