चाराणे नको आठाणे नको

Started by कदम, February 21, 2017, 11:18:21 PM

Previous topic - Next topic

कदम

चाराणे नको आठाणे नको

कशी पाहिजे तशी घ्या
काळजी आमच्या पण पोटाची घ्या
चाराणे नको आठाणे नको
भाव एकच पाहिजे त्याचा सरसकट

आवक बाजारी लयं वाढली
फजिती मालानं चार-चौघात बरी काढली
मागणी आता स्वस्ताईची वाढली
हुज्जत ग्राहकांनी आता कशी घातली
चाराणे नको आठाणे नको
भाव एकच पाहिजे त्याचा सरसकट

माल पडुन पडुन सडला
थांबा,हूडकून हा अस्सल आणला निवडूनी
जावू नका...!असं मालास चिवडूनी
लावून बाजारी असं धुडकावूनी
चाराणे नको आठाणे नको
भाव एकच पाहिजे त्याचा सरसकट

विचारपुसेचा प्रश्न कसला
हेरून मी माल हा भरला
घेवून टाका चुका,ह्यो पालक
फिरून येणं होईल मागं,
विचारील जेंव्हा मालक
चाराणे  नको आठाणे नको
भाव एकच पाहिजे त्याचा सरसकट

एक त्याचा एक माझा
ग्राहक सेवेचा आमचा हा वसा
होणार नाही रिकामा तुमचा खिसा
चाराणे नको आठाणे नको
भाव एकच पाहिजे त्याचा सरसकट