कारण काहीच नसताना

Started by कदम, February 22, 2017, 10:34:26 PM

Previous topic - Next topic

कदम


मन आपले आपलेच असताना
जीवनात जीवनरंग भरताना
जीव भांड्यात पडलेला नसताना
दुखावते हदय काहून,
प्रेम सर्वांवर असताना
कारण काहीच नसताना ...

सोबतीला दुनिया असताना
प्रवास घडीभर करताना
मार्गदर्शक सर्वञ असताना
हरवते दिशाभान काहून,
प्रवास गर्दीतून असताना
कारण काहीच नसताना ...

मिञ मैञीणी असताना
कमी काहीच नसताना
नाती जोडत चालताना
येते मनात चिंता काहून,
आपलीच सुबत्ता टिकवताना
कारण काहीच नसताना ...