ढोंग प्रेमाचं...

Started by गणेश म. तायडे, February 24, 2017, 10:16:59 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

जर सोडायचं असेल तर नक्की सोड
पण प्रेमाचं हे फसवं ढोंग करू नको
माहित आहे मला नाही करमत तुला
पण...
माझ्यासोबत राहायचं वचन देऊ नको

जीव सुटलाय तुझा आता माझ्यातून
तरी तू अडकल्याचा दावा करू नको
शब्द जरी ऐकावेसे वाटले मला तुझे
पण...
बोलून माझ्यावर उपकार करू नको

मी बसलो तुझ्या प्रतीक्षेत हतबल
तरी तू उगाच वाट माझी पाहू नको
जरी माझा जीव कि प्राण आहेस तू
पण...
माझ्यात तू आता जिवंत राहू नको

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11