तुला पहावसं वाटलं की

Started by Rahul Ghorpade, February 24, 2017, 02:20:07 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

तुला पहावसं
वाटलं की
मी कविता लिहायला बसतो...
कविता लिहीत असताना
प्रत्येक शब्दात
तुलाचं पाहत बसतो...
तुला पाहत असताना
कळतचं नाही
मी किती लिहीत बसतो...
लिहून झाल्यावर
कळतं मला
मी फक्त तुलाचं पाहत बसतो...
तुला पाहत असताना
मी असा काही
तुझ्यात हरवून जातो
सगळं सोडून मगं
बस तुलाचं पाहतं बसतो...
खूप आवडतीस
तु मला हे मी
स्वतःलाचं सांगत बसतो...
एकटा झाडाखाली
बसून तुझाचं
विचार करत बसतो...
तुझाचं विचार
करत असताना
समोर मगं तुलाच पाहत बसतो...
Rahul Ghorpade