शोधताना तुला...

Started by गणेश म. तायडे, February 25, 2017, 09:20:55 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

शोधताना तुला, हरवलो आहे मी
सांग कुठं शोधू, थकलो आहे मी ||

ये जरा समोर, भांड माझ्यापाशी
व्यथा मनाच्या, मांडतो तुजपाशी ||

खेळ जीवाचा, आता पुरे झाला
तुला भेटण्याचा, वेळ निकट आला ||

कळू दे तुलाही, भावना मनातल्या
सांगू दे तुलाही, गोष्टी स्वप्नातल्या ||

मनात खुपकाही, दडलेले आपल्या
स्पर्शूनी मला तू, खुणा दे आपल्या ||

अर्थहीन शब्दास, तूझा अर्थ दे
नाजूक भावनांना, तूझा स्पर्श दे ||

हृदय माझे हळवे, सांभाळ तू जरा
पापण्यात झाकुनी, साठव तू जरा ||

तू स्वप्न माझे, रोज मला पडणारे
झोपेत असताना, तुला शोधणारे ||

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11