दुर देशीचा....

Started by masterkr, February 25, 2017, 10:12:41 AM

Previous topic - Next topic

masterkr

दुर देशीचा..

दुर देशीचा आला कोणी
विरले माझे भान मला
उरले आता फक्त चांदणे
जडले त्याचे ध्यास मला...

थबकत उठला आला जवळी
ओठांवरती माझ्या लाली
पाहत बसला मनात हसला
कांती ही मखमाली...

शब्द जणु हे भरकटलेले
देहभान ही अवखळलेले
घेऊनी ह्रदया वारा गेला
दोन फुलांच्या भेटी...

स्पर्श सुखाचा असे आगळा
एकदुजासही नसे वेगळा
आतुर झाले मन हे वेडे
या शांतीच्या प्रहरी...


---- केदार जोशी
   जऴगाव जामोद
  (9130838443)