मी कुठं तुला रोखणार आहे

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, February 25, 2017, 10:15:19 AM

Previous topic - Next topic
तुला जायचं तू
जाणारच आहे
मी कुठं तुला
रोखणार आहे

तुला हात सोडायचा
तू तो सोडणार आहे
मी कुठं तुला
रोखणार आहे

तू दुसऱ्याची आहेस
तू पुन्हा जाणारच आहे
मी कुठं तुला
रोखणार आहे

तुला माझ्या सोबतच
नातं तोडायच आहे
ते तू तोडणारच आहे
मी कुठं तुला
रोखणार आहे

तू मला शेवटी
आठवणीत तुझ्या
मारणारच आहे
मी कुठं तुला
रोखणार आहे

*✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).*मो.9637040900.अहमदनगर