विरहकवितेवरील टीका

Started by Akshay Aiwale, February 26, 2017, 10:04:43 AM

Previous topic - Next topic

Akshay Aiwale

मित्रा तू लिहितोस कविता मनातल्या
मांडतोस आठवणी प्रेमातल्या
पण खरं सांगू
रागवू नकोस मित्रा
तुझ्या मनातल्या साठवणी
आणि साठवणीतल्या आठवणी
यामध्ये मला प्रेम कुठंच दिसत नाही
दिसतो तो मत्सर, दिसतं ते ज्वलन
आणि ज्वलनातील आगतिकता
मी वाचलं, मी पाह्यलं
आणि मी ऐकलं प्रेम
सरतेशेवटी अवलोकनही केलं
म्हणून सांगतो ऐक, मित्रा
मीही करेन प्रेम
पण माझं प्रेम कातड्यावर नसेल
तर आतड्यावर असेल
आतड्यातील संवेदनेवर असेल
कवीकल्पना नाही पण
खरं सांगतो
वास्तवतेचा निखारा मी झुगारणार नाही
आणि म्हणूनच तिच्या देहसौंदर्यावर कविता मी लिहिणार नाही
मीही करेन प्रेम मित्रा
पण माझं प्रेम सजीव सापळ्यावर नसेल
तर अजीव मनावर असेल,
तिच्या अंतरातल्या आत्म्यावर असेल
आणि तिच्या बाह्यवृत्तीवर असेल
अशाच अस्तित्वहीन गोष्टींवर करेन प्रेम
तू कर प्रेम यौवनावर, शृंगारावर आणि तिच्या "सर्वस्वावर"
मी करेन प्रेम तिच्या मनातील फक्त अस्तित्वावर
आणि मग पाहा तुझ्या आणि माझ्या प्रेमकवितेवरील समीक्षा किती भिन्न येते...

सर्व विरहकवींना उद्देशून

- अक्षय ऐवळे