आठवडा

Started by ganesh bunde, February 26, 2017, 02:38:31 PM

Previous topic - Next topic

ganesh bunde


शेवटी आला आज रविवार
मिळाली फुरसत थोडीफार
आठवडाभर करून मारामार
मिळाली सवड थोडीफार ||१||
किती ती धावाधाव, दिवसभाऱ्याची दगदग,
राजच होत असते कामाची लागभग,
आठवड्या अंती होतो मी बेजार ||२||
रोज रोज करतो मी काम ,
जीवाला नाही मिळत जराही आराम,
कधी वाटते नोकरीला द्यावा रामराम,
महिनाही संपतो तरी मिळत नाही पगार ||३||
                                   --- गणेश बुंडे