प्रेमजीवन

Started by ganesh bunde, February 26, 2017, 03:17:30 PM

Previous topic - Next topic

ganesh bunde

           प्रेमजीवन
कधी तू तर कधी मी एकमेकांवर प्रेम करावे,
या आपल्या प्रेमातून एक सुंदर जग उरावे,
तू माझी आणि मी तुझा तेथे होऊनि राहावे,
त्या प्रेमाच्या जगामध्ये आपल्या प्रीतीचे रंग भरावे.||1||

जे माझ्या मनात आहे, तू काही मज बोलावे,
कधी कधी न बोलता, ते तुला कळावे,
दुःख थोडेसे तुला होता, अश्रू माझ्या डोळ्यात यावे.
सुखाचे  सर्व क्षण मजकडून तुला मिळावे.
हळू हळू त्या प्रेमाच्या रंगाने सारे जग बहरावे.||2||
                                           ---- गणेश बुंडे(9595941269)