अव्यक्त प्रेम तिचं नी माझं

Started by Rahul Ghorpade, February 26, 2017, 07:15:51 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

.....का होत हे असं.....

जेव्हा मी तिला पाहतो
ती पण मला पाहती
ज्या नजरेने मी पाहतो
त्याच नजरेने ती पण पाहती

जेव्हा मी धाडस करून बोलतो तिच्याशी
ति का अबोला धरते माझ्याशी
का बोलावं वाटतं नाही तिला माझ्याशी

जेव्हा चोरून पाहत असतो मी तिला
तेव्हा ती पण चोरून पाहत असते मला
तिला वाटत कळत नाही ह्याला
पण सांगा रे कुणी तिला
सगळं कळतयं मला

खूप प्रेम करतो
मी तिच्यावर
खूप प्रेम करती
ती माझ्यावर
मग का अबोला धरलाय तिने
कळतचं नाही मला

खूप वेळा प्रयत्न केला मी तिच्याशी बोलण्याचा
प्रत्येक वेळेस तिने तिरस्कार केला माझ्या प्रेमाचा

खोट का बोलती ती माझ्याशी हेच कळत नाही मला
कळून जातं मगं मला डोळ्यांत पाहील्यावर तिच्या
अव्यक्त आहे प्रेम आमचं कळून ही न कळणारं कुणाला

    राहुल घोरपडे