एकतर्फी

Started by masterkr, February 27, 2017, 10:30:05 AM

Previous topic - Next topic

masterkr

एकतर्फी...

भेटली स्वप्नात माझ्या भेटते का मंदीरी
दोन दिस ठेवून जा काळीज माझे अंतरी

जीर्ण झाली विछिन्न झाली जीवनाची स्पंदने
आरशाला भुल पडली मंद झाली कांचने
आज तुझ्या आठवांचा स्पर्श झाला का उरी
दोन दिस ठेवून जा काळीज माझे अंतरी

उगवणाऱ्या चांदण्यांना तु उगा का रूसविले
पेटणाऱ्या काजव्यांना तु उगा का विझविले
स्पष्ट झाल्या भावना छळणार आता का तरी
दोन दिस ठेवुन जा काळीज माझे अंतरी

एक आता सांगतो तोडू नको माझ्या फुला
स्वर्ग माझ्या काळजाचा भेट केला हा तुला
ओस झाल्या आसवांना ओघळावे का परी
दोन दिस ठेवुनी जा काळीज माझे अंतरी

  केदार जोशी
जळगाव जामोद
(9130838443)