त्यांनाही तुम्ही समजून घ्या

Started by amol takate, February 27, 2017, 01:08:58 PM

Previous topic - Next topic

amol takate

लहानपणी ज्यांनी हाताचं बोट धरून शिकवलं चालायला,
वय झाल आता त्यांचे म्हणून लागले तुमचा हात मागायला,
कारण आता त्यांनाही तुम्ही समजून घ्या....
तुमच्यासाठी सोसले असतील त्यांनी किती दुःख,
बाकी काही नको आता त्यांना हवय फक्त तुमच्याकडून सुख,
कारण आता त्यांनाही तुम्ही समजून घ्या....
नका देऊ त्यांना कधी वागणूक खालची,
हवय त्यांना फक्त तुमची माया आन् प्रेम कारण ते नाहीत पैश्यासाठी लालची,
कारण आता त्यांनाही तुम्ही समजून घ्या....
कधी कुणी विचारले आई बाबा कुणाकडे असतात,
तर मग सांगा मीच आई बाबांकडे असतो,
कारण आता त्यांनाही तुम्ही समजून घ्या....
दाखवू नका त्यांना कधी आश्रमशाळा,
कारण तुमचा लागलाय त्यांना लहानपणापासून लळा,
कारण आता त्यांनाही तुम्ही समजून घ्या....

अमोल ताकटे (९४०३९०६२२९)
अहमदनगर