कर्ज

Started by Rahul sarode, February 27, 2017, 02:43:14 PM

Previous topic - Next topic

Rahul sarode

काही जाच असे असतात न
जे जन्मभर झिजून पण सुटत नाही
परतीच्या वाटेवर वारा तर असतो
पण सलगीची सावली मात्र नसते
दिवसेंदिवस फुलत जाणाऱ्या नात्यात वीण तर असते
पण एका अवास्तव वाढणाऱ्या कर्जाचा ढीग हि असतो
जखम त्या कर्जाची मात्र नसते
खन्त असते ती परतफेड न झाल्याची
आयुष्याची पाने  अशीच हळू हळू भरु लागतात पण तो ढीगार मात्र असाच जन्मभर बोचत राहतो
                   राहुल सरोदे