कविता IIमौनात गुंतले सारे , यौनाचे मुक्त वारे II

Started by siddheshwar vilas patankar, February 27, 2017, 08:02:30 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


मौनात गुंतले सारे
यौनाचे मुक्त वारे
धुंदावल्या दिशा दाही
भासे सम सूर्य तारे II१II

क्षितिजात भेट झाली
हृदयात थेट आली
धमन्या त्या मंद साऱ्या
रक्ताची लाट उसळली II२II

हास्यात स्मित दडले
डोळे डोळ्यांशी भिडले
मौनाने मात केली
हृदयाचे तुकडे पडले II३II

गुंगावली मती सारी
थंडावला जोश सारा
गात्रांनी मात देता
मेंदू ऊरे बिचारा II४II

सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C