एक होती ती...

Started by गणेश म. तायडे, February 28, 2017, 11:11:48 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

एक होती ती
तीच्यावर मी प्रेम करायचो
ती नाही बोलली कधी तर
उगाचच रुसून बसायचो

एक होती ती
तिला मी रोजच पाहायचो
ती नाही दिसली कधी तर
कावरा बावरा व्हायचो

एक होती ती
तिला मी रोजच हसवायचो
ती नाही हसली कधी तर
मी खोटं खोटं रडायचो

एक होती ती
तिला मी नेहमीच सांगायचो
ती नाही ऐकली कधी तर
मी गाल फुगून बसायचो

एक होती ती
तिला मी स्वप्नातच शोधायचो
ती नाही आली स्वप्नात तर
मी तिच्या स्वप्नात जायचो

एक होती ती
तिला मी कधीच ना दिसायचो
तिला नाही दिसलो कधी तर
मी असाच रोज मरायचो

एक होती ती
तिला मी कधीकधीच भासायचो
होऊनि गार हवा कधी तर
मी शहारे तिच्या अंगी आणायचो

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11