विश्वासचं नव्हता तिला माझ्यावर

Started by Rahul Ghorpade, February 28, 2017, 02:49:40 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

विश्वास नव्हता ना
तुला माझ्यावर
देईल तुझी
मी आयुष्यभर...
नाही केलं ना गं
तितकं प्रेम
मी तुझ्यावर
पाहीजे होत तुला जितकं प्रेम...
विचारलं असतं
तु तेव्हाच
तर बर झालं असतं
किती प्रेम करतो
रे राहुल तु माझ्यावर
सांगीतलं असतं ना
गं मी तुला
किती प्रेम
करतो मी तुझ्यावर....
विश्वासचं नव्हता ना
तुला माझ्यावर
मग का खोटं
प्रेम केलंस गं तु माझ्यावर...
का धरलास
हात माझा
का दाखवलीस
खोटी स्वप्ने मला...
बर झालं गं तु गेलीस मला एकट्याला सोडून
निदान प्रेम काय असत हे तर कळलं आता मला...
तु दाखवलेली ती स्वप्ने
माझं आयुष्य जगाण्याचं कारण बनलीत आता
त्या स्वप्नांना मी पुर्ण करणार जी आपण पाहीली होती...
खूप पुढं गेलीस आता तु मला सोडून मागं
खोटं वाटलं ना तुला
माझं प्रेम...
तर एकदा बघ
माग वळून माझ्याकडं
उभा असणं मी एकटाचं आपली स्वप्ने घेऊन तळहातावर...
♡ राहुल घोरपडे ♡