प्रेम करावे...

Started by गणेश म. तायडे, February 28, 2017, 05:35:35 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

उघडावे नयन दल
ती मुक्त चालत यावे,
घेवोनि मज संग
तिने मुक्त उडावे...

नसावे संभ्रम मनी
कुणाचा रोष नसावा,
सोडोनि द्यावे आम्हांस
प्रेमाचा सुगंध असावा...

जपावे मनीचे मनी
प्रेम मुक्तछंद करावे,
दाखोनि अंतरीचे
एकमेकांस वर्णावे...

असावे नसावे कुणी
प्रेम मनी जपावे,
छळोनि जावे कुणीही
आपण प्रेम वाटावे...

उडावे पाखरू बनूनी
प्रेमगगनी झेप घ्यावे,
पाहोनि झरे डोंगरी
प्रेमात मुक्त कोसळावे...

वाहावे नदी सारखे
सागरात लुप्त व्हावे,
बनोनि तारे नभिचे
चंद्रास हि मोहवावे...

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11