खूप शोधलं मी पण

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, March 01, 2017, 07:11:10 AM

Previous topic - Next topic
*खूप शोधलं मी पण*
*ती आता भेटत नाही*
*ते दिवस पुन्हा आठवतो*
*मी पण ते दिवस पण*
*आता आठवत नाही*

*वेळ कसा घालवायचा*
*याचे आपण कारण*
*शोधत होतो आता तशी*
*वेळ पण येत नाही*

*आठवणीत तुझ्या रात्र*
*सुद्धा मोठी वाटत होती*
*तशीच आठवण तुझी*
*आता येत नाही*

*दिवस भर तुझ्या*
*सोबत घालवलेला*
*तो दिवस आता*
*तो दिवस पुन्हा येत नाही*

*प्रत्येक दुःखात तुझ्या*
*अश्रू येत होते डोळ्यात*
*ते अश्रू पुन्हा डोळ्यात येत नाही*

*गुंतलो होतो खूप तुझ्यात मी*
*जीव लावून देखील सखे*
*तुझा जीव माझ्यात कधी रंगलाच नाही*


*✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील)*.मो.9637040900.अहमदनगर