प्रेम असं एकट्यानी नसतं करायचं....

Started by Prasad.Patil01, March 01, 2017, 06:56:03 PM

Previous topic - Next topic

Prasad.Patil01

ती अन तू कायम सोबत,
हा विचार जरी खास होता..
अरे आतातरी लक्षात घे,
तो फक्त एक भास होता..
तुझ्यात अरे रमायला ती,
तयार सांग ना कधी होती ??
राहिला प्रश्न गरजेचा,
तिला तुझी गरज कधीच नव्हती..
कळत नव्हतं तिच्यावर,
तू कुठला हक्क गाजवत होता..
दोन जणांचा राग तू ,
एकटाच कसा वाजवत होता ??
ऐक असं अगदी कुणावर,
जीवापाड असं नसतं मरायचं..
तुला कधी कळणार हे अरे,
प्रेम असं एकट्यानी नसतं करायचं..
                                    प्रसाद पाटील
                                    (स्वलिखित)