मी तुझ्यातच तुला पाहतो...

Started by Prasad.Patil01, March 01, 2017, 07:04:05 PM

Previous topic - Next topic

Prasad.Patil01

कोणी हक्काचं हवं मन मोकळं करायला..
ती मैत्रीण मी माझी मी तुझ्यात पाहतो..
मी खचता कुणी हवं आधार द्यायला..
तो धीर मी माझा मी तुझ्यात पाहतो..
मी चुकता हवं कोणी मला सावरायला..
तो आरसा मी माझा मी तुझ्यात पाहतो..
पाहताना पापण्याही मिटाव्या ना असे..
ते लावण्य परीचे मी तुझ्यात पाहतो..
जी जपते जगताना मने साऱ्यांची..
ती निस्वार्थ काळजी मी तुझ्यात पाहतो..
असे आपसूक पाणावे डोळे ग ज्याचे..
ते हळवेे तेे बाळ मी तुझ्यात पाहतो..
अर्पावे हसता मी आयुष्य ज्यासाठी...
ते निरागस प्रेम मी तुझ्यात पाहतो..
सप्तरंग परीपुर्ण जसा इंद्रधणू..
मी तुझ्यातच तुला मी तुला पाहतो..
                                 प्रसाद पाटील
                                 (स्वलिखित)