किती सोपं असतं ना, "विसरून जा " म्हणायला

Started by Swapnil Dhobale, March 02, 2017, 01:49:05 AM

Previous topic - Next topic

Swapnil Dhobale


किती सोपं असतं ना,
"विसरून जा " म्हणायला
खरं तर काहीच अर्थ नसतो,
तिच्याशिवाय जगण्याला.....

किती सहज बोलतात बोलणारे,
'आपल्याकडे मुली साठ ,
एक गेली-एकोणसाठ '
हा तर त्यांना न कळलेला प्रेम-पाठ...

तिच्यासारख्या असतीलही लाखो ,
कदाचित या जगात ,
पण तिचे वेगळे स्थान आहे,
त्या एक  लाखांत...

प्रेम नसेलही माझ्याविषयी,
कदाचित तिच्या मनात,
पण मला आनंद वाटतो,
तिच्या आनंदात......

बहुतेक हाच आनंद मला,
दु:ख विसरायला भाग पाडत असावा,
अन ह्या एकाकीपणात , पुन्हा एकदा,
तिच्या आठवणी मनात घेतात विसावा......