मी लढतोय...

Started by samudra, March 02, 2017, 11:39:58 AM

Previous topic - Next topic

samudra

मी हसतोय पण हर्षीत नाही
मी रडतोय पण आटत नाही
मी तुटलोय पण विखरलो नाही
मी पडतोय पण थांबत नाही..

मी जळतोय पण दाहक नाही
मी झिजतोय पण संपत नाही
मी मोडलोय पण झुकत नाही
मी थकलोय पण झोपत नाही...

मी लढतोय कारण मी हरलो नाही.
मी लढणार जोपर्यंत मी जिंकत नाही....