सुखा मागचं काळं सत्य

Started by शिवाजी सांगळे, March 03, 2017, 03:42:28 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

सुखा मागचं काळं सत्य

सुखाचं काय?
ते सहज नाही पचत,
झालंच सहन तर?
दाटतात अश्रु
डोळ्यात आनंदाचे,
वाटतं कुणी तरी
असावं सोबत...
साजरं करायला ते सुख.
अभिनंदन करतं कुणी...
शुभेच्छा मिळवतं
हसत हसत नवी प्रेरणा देतं
महत्वाचं म्हणजे...
ते मिळवायची उर्मी देतं
माणसं गोळा करू लागत,
नवं जगायला शिकवतं,
कधी मार्ग पण चुकवतं...
कशाच्या तरी आहारी नेतं
भान ठेवलच तर टिकतं
अन्यथा...?
आयुष्यातुन उठवुन देत !
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९