निसर्ग

Started by Rani27, March 03, 2017, 07:03:58 PM

Previous topic - Next topic

Rani27

कुणीतरी काहीतरी सांगावे हळूच ,

मनातल्या गुपिताना फुटवे पाय उगाच,

मोहरलेल्या त्या आंब्याच्या वनात धुंद तो श्वास ,

रानातल्या फुलांना दिसावी ती मंदिराची वाट

हिरव्याकंच त्या वेलीला गवसावे ते आकाशाचे घर

हवलेल्या त्या वासराला मिळावी ती गावाची वेस

प्रेमाचे ते हितगुज आणि पाखरांचा तो किलबिलाट

व्हावे मन धुंद ह्या निसर्गाच्या मायेत.



- राणी