प्रश्न

Started by Rani27, March 03, 2017, 07:05:24 PM

Previous topic - Next topic

Rani27

प्रश्नात प्रश्न सारेच गुंतून गेले

ओठातले शब्द ते ओठातच विरून गेले

वाटले खूप भांडावे, पण साधे विचारायचे पण राहूनच गेले

आकाश माझ्यावर कोसळवून तू निघून  गेला ........

पण अचानक वारा  गार तो सुखावून गेला

निखळ पाऊस तो ओथंबून गेला ......

तन ओले नि मन तृप्त करून गेला

ओल्या मातीचा तो सुगंध वेडावून गेला

वाऱ्यासमवेत नाचताना मन ते धुंद होऊन गेले

कळलेच नाहि कधी ते अश्रू डोळ्यातच सुकून गेले

क्षणातच मोकळे ते आभाळ झाले .......

सुटलीस तू आता वेडावत बोलले





- राणी