वाटलं तुला काही तर

Started by Dnyaneshwar Musale, March 04, 2017, 08:24:56 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

वाटलं तुला काही
तर ये परत भेटायला
साठलेलं तुझं माझं
प्रेम पुन्हा एकदा वाटायला

वाटलं तुला काही
तर परत ये बोलायला
हसुन खेळुन पोखरणाऱ्या
आठवणींना खोलायला

वाटलं तुला काही
तर परत ये वाटबघायला
दिसेल तुला डोळ्यातल पाणीही आठत नाही
जेव्हा कुणासाठी लागतो  कुणी तरी जगायला

वाटलं तुला काही तर
ये परत माझ्या सोबत फिरायला
कळेल तुला जीवापाड प्रेम करून एकट्यालाच
कस लागतं झुरायला.

वाटलं तुला काही तर
परत ये शेजारी बसायला
समजुन जाशील तु
तुझ्या विना घाबरतो
जगासमोर हसायला.

वाटलं तुला काही तर
परत ये प्रेम करायला
विखुरलेल्या रंगांना
एक रंग करून जगायला .