नक्की बदलं काय

Started by Dnyaneshwar Musale, March 04, 2017, 09:58:55 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

चांदो मामाच्या गोष्टी आता कुणी ऐकवत नाही
काही केल्या बाळ मात्र मोबाईल शिवाय झोपत नाही
शिमगा चैत आता आम्हाला कळत नाही
गोधडी शिवायला आता सुई सुद्धा वळत नाही
पंखा एसी शिवाय आम्ही काही घरात बसत नाही
सावलीखाली बसायला पिंपळ काय दिसत नाही
पोत्याचा घोंगटा आता कुठं उसवत नाही
रस्त्यावरची पोरही पहिल्या पावसात भिजताना नाचत नाही
घर सारवताना मातीचा वासही कुठं येत नाही
फरशीवरती रांगोळी कधी हसताना दिसत नाही
कंदिलाच्या प्रकाशात आता अभ्यास काय व्हतं नाही
लाईटीच्या लक्ख उजेडातही मार्क काय मिळत नाही
आता नावं घेताना ती ही काय लाजताना दिसत नाही
पिल्या शिवाय तो ही मित्रांसोबत बसत नाही
नक्की बदलं काय हे काही केल्या कळत नाही
गिरणीतुन दळण आता  बारीक कधी दळत नाही.