चोरकवी

Started by गणेश म. तायडे, March 04, 2017, 10:46:03 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

हि कविता खास त्या कवींसाठी आहे,
जे दुसऱ्यांच्या कवितेचं श्रेय स्वतः घेऊ पाहतात,
कृपया प्रोत्साहन द्या पण चोरी नका करू,
कविता आवडली तर कवीच्या नावासह शेयर करा...

सोनेच जाई चोरीला
ना जाई कधी माती
सुख लाभे हो कसे
चोरकवी हो बनूनी

उष्ट्या त्या भावना
खरकट्या मनावरी
कसे तुम्हा वाटे बरे
चोरकवी हो बनूनी

द्यावे प्रोत्साहन आम्हां
लिहितो जीव जाळुनी
कसे झाले तुम्ही कवी
चोरकवी हो बनूनी

लिहा तुम्ही काहीतरी
हीच आहे मज मागणी
कसे कळतील शब्द
चोरकवी हो बनूनी

प्रेम शब्दांवर केले
कडव्यात मन रमुनी
कसे कळणार तुम्हां
चोरकवी हो बनूनी

- गणेश म. तायडे, खामगांव
www.facebook.com/kavitasangrah11