नको पाहिजे...

Started by कदम, March 04, 2017, 11:21:24 PM

Previous topic - Next topic

कदम

नको पाहिजे प्रेम ते
भेटून पून्हा हिरावणारे
हसवून पून्हा रडवणारे
रडवून पून्हा हसवणारे
सूख ते दू:खा मागून येणारे

नको पाहिजे अस्तीत्व ते
घडवून पून्हा मातीत मिसळणारे
ऊभा करून पायावर पायदळी तुडवणारे
मला माझ्यापासून दुरावणारे
तारूण पुन्हा झुकवणारे

नको पाहिजे स्वातंञ्य ते
ओळख माझी मिटवणारे
झगडण्या पुन्हा पारतंञ्यात नेणारे
प्रगतीचा पथावर पावलो पावली वाकवणारे
संकटकाळी नित्य डावलणारे