मराठीस मागणे

Started by कदम, March 05, 2017, 02:43:56 AM

Previous topic - Next topic

कदम

करू कविता
का ? जोडून मुळाक्षरे
घडवू नवीन शब्द
जे देतील लेखणीला खरा अर्थ

करू भाव मनाचे मुक्त
का ? रचू ईतिहास विभक्त
मुळाक्षरांच्या बुंध्यापासुन
वेगळी करू कशी कवितेची फांदी

मराठीचे मोल मराठीत लेखू
का ?होईल असे कळुन कुणास काही ना कळले
सगळे ते सगळे कसा लेखू आगळे
विभक्त तो विभक्त कसा लेखू भक्त

आद्याक्षर तो "श्री"
गणेशा कसा निराळा लेखू
दे गा दान हे मला लेखनीला मराठी
येऊदे लेखणीला भरभराठी