तिची आणी माझी पहिली भेट

Started by Rahul Ghorpade, March 08, 2017, 07:32:07 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

.....तिची आणी
माझी पहिली भेट.....

एका झाडाखाली भेटलो आम्ही पहिल्यांदा
बोलण्याची भिती वाटली मला आयुष्यात पहिल्यांदा

कधी बोल्लो नव्हतो या आधी मी कोणत्याच मुलीशी
खूप लाज वाटली मला तिच्याशी बोलताना

मान खाली घालून
नजर दुसरीकडे
करून बसलो होतो मी
मग तिने पुढाकार घेतला
बोल ना रे किती लाजतोस तु

लाजून बोललो मी
खूप लाज वाटतीये ग मला बोलायची
बोल्लो नाही गं मी कधिही कोणत्याच मुलीशी

ती बोल्ली किती
लाजतो रे तु
आता कसं सांगणार
होतो मी तिला
असा आहे गं मी लाजरा
....राहुल घोरपडे....