गुरु

Started by Shekhar jangam5200, March 08, 2017, 08:28:09 PM

Previous topic - Next topic

Shekhar jangam5200

जय गुरुदेवा जय गुरुदेवा
ऐसेची कृपाछत्र राहो आम्हावरती

हेचि मागणे गुरुराया तुम्हा चरणी
धन्य जाहलो जन्म मिळाला मानव कुळी

मस्तकाला स्पर्श होता गुरु चरणांची धुळी
दुःख क्लेश सारी मिटुनी जाती तत्क्षणी

गुरूंचे स्मित हास्य दिसता या नयनांसी
आनंदी आनंद वाटे या भाबड्या मनासी

  शेखर जंगम,शिये,कोल्हापूर.