अधुरं प्रेम

Started by Shekhar jangam5200, March 09, 2017, 10:07:06 PM

Previous topic - Next topic

Shekhar jangam5200

 जीवनातील अतिशय नाजूक वळणाची वाट
नेहमीच हवीहवीशी वाटणारी मंजूळ लाट

तारुण्यात आले कि प्रेमाने सजूनी जातं मन
मग प्रत्येक क्षण न क्षण होऊन जातात सण

हळूच कोणीतरी मनापासून आवडायला लागतं
तिच्यासाठी रात्र रात्र मन हे वेडं जागायला लागतं

तिला पाहिलं की मन अगदी मोहरून जातं
मग उगाचच तिला पाहण्या नजरेचं भिरभिरणं होतं

वाटतं हिम्मत करून आज विचारूनच टाकावं
ती समोर आली अन मुखातले शब्द कंठातच रहावं

ओठांचा थरकाप उडुनी शब्द विरुनी जातात प्रेमाचे
असेच अधुरे राहुनी जाते प्रेमगीत गाण्या आमचे

तिला कळूनही प्रेमाचा गंध तरीही निशब्द ते मन झाले
घडल्या नाही भेटी या जन्मी शेवटी अधुरं प्रेम राहिले

चंद्रशेखर जंगम,शिये,कोल्हापूर.