श्र्वाशाग्नी

Started by कदम, March 09, 2017, 11:12:43 PM

Previous topic - Next topic

कदम

**********updated************
शुद्ध बीजा पोटी अंकुर
पर्ण रूपी उमलते हळुवार
घेवूनी मृदेचा गंध अपार
वृक्षास करी वाढण्या सहकार

ऋतु निसर्गाचे आगळे वेगळी मांडणी
बीज रूजवते नाते त्यासवे हळुवार
भगवंताला घालण्या गवसणी
जणु झेप गगनी घेते हळुवार

दूषित जगीची असली जरी रीत
बीजाला असते वनाशी प्रित
वेलवर्गी कटिपर्णी वेगवेगळे वर्ण
वृक्ष होतो बीजातूनी सुवर्ण

बीजाने होते वृद्धींगत भूमी
वृक्षांनी करते सुशोभित धरणी
रानी माळरानी पाणथळ जमिनी
बीज देते फुलुनी प्रामाणिक श्वासाग्नि