भावना माझ्या मनातील

Started by Tejas khachane, March 10, 2017, 12:16:12 PM

Previous topic - Next topic

Tejas khachane

भावना माझ्या मनातील
मी शब्दांत गुुम्फत होतो
कधी तरी कळेल तुला
म्हणून प्रयत्न करत होतो

मनात माझ्या आले
जेव्हा जेव्हा तुझे भाव
शब्दाना मिळत गेला
हळू हळू वाव

माझी तुझ्या बद्दलचि आपुलकी
मी शब्दात माळत गेलो
हृदयतील स्पंदनांचे ठोके
त्याच शब्दान्त पुनः पुन्हा चाळत गेलो

पण माहित नव्हते तुला
ते कधीच ओळखु येणार नाही
शब्दांन मागचे भाव माझे
तुला कधी कळणार नाही

शब्दांन ची ती रचना माझी
तुलाही खुप आवडत गेली
पण कवितेचे ते स्वरुप
शेवटी कविताच राहिली

शेवटी कविताच राहिली......

TSK